बिभवी विभागातील अकरा गावांमधील मतदार म्हणे ‘कमळच हवे’
चारुशीला पवारांना बिभवीसह अकरा गावांत वाढता पाठिंबा

सायगाव : वास्तवनामा वृत्तसेवा
सायगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ.चारुशीला विवेक पवार यांना सायगाव गणातील पश्चिमेकडील अकरा गावांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. येथील मतदार म्हणे “आम्हाला कमळच हवे”
सायगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ.चारुशीला पवार यांच्या प्रचारार्थ मोरावळे, केसकरवाडी, केंजळ, भणंग, ओझरे यासह या विभागातील अकरा गावांमध्ये प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी चारुशीला पवार यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
यावेळी सौ. चारुशीला पवार यांनी विनम्रतापूर्वक मतदारांशी संवाद साधत, मी एक सामान्य कुटूंबातील असून सायगाव गणासाठी निवडणूक लढवीत आहे.आपले सर्वांचे नेते बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यात कुठेही कसूर ठेवली नाही.त्यामुळे आपण भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला आपले बहुमूल्य मतदान देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
यावेळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग प्रचार रॅली दरम्यान दिसून आला प्रचार रॅलीत प्रतापगड कारखान्याचे व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर, संचालक शांताराम उर्फ नाना पवार, दादा पाटील, विठ्ठल मोरे, रायगाव सोसायटीचे माजी चेअरमन शरद निकम, पांडुरंग वाघ, ओझरे सरपंच अजित मर्ढेकर,मच्छिंद्र क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



