सायगाव गणातून चारुशीला पवारांच्या पाठीशी महिलांची मोठी फळी
गणेश जयंतीदिनी गणेशाचे दर्शन घेऊन केला प्रचाराचा शुभारंभ

कुडाळ :वास्तवनामा वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीच्या सायगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. चारुशीला विवेक पवार यांच्या पाठीशी सायगाव गणातील महिलांची मोठी फळी कार्यरत झाली असून, तालुक्यातील सहा गणांपैकी सर्वाधिक मताधिक्याने सायगाव गणाच्या उमेदवार चारुशीला पवार यांना निवडून देण्यासाठी महिलांची ही फळी प्रचाराच्या कामाला लागली आहे. गणेश जयंतीदिनी चारुशीला पवार यांच्या प्रचाराचा असंख्य महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
आनेवाडी गावाने सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड करत एकजूट आणि विकासाचा ठोस संदेश दिला आहे.सायगाव गणातून दिला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत ग्रामस्थांनी “गाव प्रथम” ही भूमिका घेत त्यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.व चारुशीला पवारांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
सायगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारूशिला विवेक पवार यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यानतर गावातील महिला, तरुण, प्रौढ, शेतकरी, अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी एकमुखाने या उमेदवारीचे स्वागत केले असून शंभर टक्के मतदानाचा व विजयाचा निर्धार केला आहे. काल गणेश जयंतीच्या निमित्ताने चारूशिला पवार यांनी त्यांच्या समर्थकासंह आनेवाडी, रायगाव,
महमुलकरवाडी, सायगाव, गावातील मतदांना व महिलांना प्रत्यक्ष भेटून प्रत्येक घरातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आसून, सायगाव गणात विक्रमी मतदान घडवून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी
व्यक्त केला.
यावेळी आनेवाडी येथील संत सावतामाळी मंदिरात सर्वाच्या उपस्थितित आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.चारूशिला विवेक पवार व त्यांचे पती विवेक पवार है सामाजिक कार्यातून पुढ़े आलेल्या आणि गावपातळीवरील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गावातील मुलभत प्रश्न, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, शेतकऱ्याच्यांसाठी सुविधा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यावर काम करण्याची त्यांची स्पष्ट भूमिका ग्रामस्थांना भावली.त्यामुळेच गावाने कार्यनिष्ठटेला प्राधान्य देत त्यांच्यावर एकमताने विश्वास टाकला आहे.
यावेळी त्यांच्या गावभेट दौर्याप्रसंगी निता जाधव, अलका
फरांदे, सुनिता जगताप, साधना देशमाने ,वैशाली फरांदे, आदी महिलांसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. सै. चारूशिला पवार यांच्या उमेदवारीमुळे सायगाव गणात राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



