राजकीय

कुडाळ पंचायत समिती गणात “” एकच वादा फक्त सौरभ बाबा””

प्रतापगड चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी कुडाळ गणाचा अर्ज केला दाखल

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा 

  जावली पंचायत समितीचे सभापतीपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असून, कुडाळ जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या कुडाळ गणातून भाजपने प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभबाबा शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी “भावी सभापती सौरभ बाबा आगे बढो”, “एकच वादा फक्त सौरभ बाबा” अशा घोषणा देत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सुनेत्रा शिंदे,जावली बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे,समीर आत्तार या प्रमुख मान्यवरांच्या सोबतच कुडाळ पंचायत समिती गणातील विविध गावचे सरपंच सोसायटी चेअरमन सदस्य तसेच मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची गर्दी होती परंतु सौरभ शिंदे यांच्या सोबत हजारो समर्थकांची  असणारी गर्दी लक्षवेधी ठरली होती आज सकाळपासूनच सौरभ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.सौरभ शिंदे यांनी अल्पावधीत आपल्या राजकीय वाटचालीत मिळवलेला अबाल वृद्ध जनतेचा विश्वास या गर्दीत स्पष्टपणे जाणवत होता. सौरभ शिंदे हे प्रत्येकाला “आपला माणूस वाटतात”त्यामुळे अलोट गर्दीत सौरभबाबा शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button