राजकीय

आंबेघर गणात ताकद असूनही सागर धनावडेंनी दाखवला मनाचा मोठेपणा

कुणबी प्रमाणपत्र असतानाही उमेदवारी केला त्याग

 मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

    गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ मेढा विभागात व कुसूंबी जिल्हा परिषद गटात जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे निकटवर्तीय व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते सागर धनावडे यांचे मोठे काम आहे.दांडगा जनसंपर्क देखील आहे. तरी देखील या गटातील आंबेघर गणात ओबीसी आरक्षण असताना व स्वतःकडे  कुणबी प्रमाणपत्र असताना देखील धनावडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रह न धरता विजयाची हमी असतानाही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारीचा त्याग केला.त्यांच्या या भूमिकेची तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

    जावली पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सभापती पदावर डोळा ठेवून अनेक जण उमेदवारीच्या रिंगणात होते. पंचायत समितीचा आंबेघर तर्फ मेढा हा गण ओबीसी पुरुष वर्गासाठी आरक्षित झाला आहे. याच गणात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे यांचे गाव आहे. त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याने ते या गणातून ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढवू शकले असते, नामदार शिवेंद्रसिंहराजेंचे व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे विश्वासू आणि कट्टर सहकारी असल्याने भाजपाचे तिकीट त्यांना शंभर टक्के मिळालेही असते व पंचायत समितीला भरघोस मताधिक्याने निवडून येऊन सभापतीच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान त्यांना नक्की मिळाला असता.

सागर धनावडे यांचे वडील दूध संघाचे उपाध्यक्ष कै.विजय धनावडे हे जात-पात न मानणारे कार्यकर्ते होते. त्यांच्याच विचारांचा वारसा जोपासत सागर धनावडे यांनी केवळ ओबीसींना न्याय मिळावा म्हणून आलेली संधी सोडली आहे. त्यांचा हा त्याग इतरांना आदर्शवत आहे. यातून नेते म्हनवणाऱ्यांनी बोध घ्यावा अशी मागणी ओबीसी समाजातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button