राजकीय

म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ वसंतराव मानकुमरे

जोरदार शक्ती प्रदर्शनात मानकुमरे, रेश्मा पोफळे, गोरख महाडीक यांचा अर्ज दाखल

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा

   जावळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या म्हसवे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या जोरावर सबकुछ मानकुमरे चा जलवा दाखवत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जिल्हा परिषद गटाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत महस्वे पंचायत समिती गणाच्या रेश्मा पोफळे व खर्शी बारामुरे गणाचे उमेदवार गोरख महाडिक यांनी देखील आपला अर्ज दाखल केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकुमरे यांनी आपला जलवा मेढा शहरात उपस्थितांना दाखवला. यावेळी म्हसवे गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

. ह भ प कळंबे महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या काटवली येथून मानकुमरे यांनी आपल्या रॅलीस सुरुवात केली. करहर,दरे बुद्रुक,आलेवाडी येथून ही भव्य रॅली मेढा तहसील कार्यालयात पोहोचली. यावेळी शेकडो  गाड्यांचा ताफा या रॅलीत सहभागी होता. रात्री उशिरापर्यंत म्हसवे गटासह जावळी तालुक्यातील उमेदवारीवर नेते मंडळींची खलबते सुरू होती. अखेर रात्री उशिरा म्हसवे गटात भाजपकडून वसंतराव मानकुमरे  यांच्या उमेदवरीवर  शिक्कामोर्तब करण्यात आले.व त्यांनी अगदी कमी कालावधीत भव्यशक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला.म्हसवे गटात भाजपाने मजबूत पकड निर्माण केली  असून, या निवडणुकीत म्हसवे गटासह तालुक्यातील कुसुंबी, कुडाळ, गटात भाजप पक्षाचेच उमेदवार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास पक्षाचे पूर्व मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी यावेळी व्यक्त केला.

    मानकुमरे  भाऊंचा कोट व डोक्याला फेटा

एरव्ही वसंतराव मानकुमरे हे साध्या वेशात असतात. साधी राहणी मात्र राजकारणावर मजबूत पकड ही त्यांची ओळख आहे. मात्र आज वसंतराव मानकुमरे चक्क कोट घालून व डोक्यावर फेटा बांधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते.त्यामुळे भाजपच्या सर्व  कार्यकर्त्यांचे  त्यांच्या वेशभूषेने  लक्ष वेधून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button