राजकीय

कुडाळ गटात जयश्री शेवतेंचे प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान

शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करताच प्रचारात घेतला वेग

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा

सत्ताधारी भाजप पक्षाचे उमेदवार निश्चित होण्यास विलंब लागत आहे .आज शेवटचा दिवस अर्ज दाखल करण्याचा असतानाच दोन दिवस आधीच कुडाळ जिल्हा परिषद गटात जयश्री संजय शेवते यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला व तुरंत आपल्या प्रचाराला देखील शेवते लागल्या असल्याने त्यांच्या उमेदवारीने प्रस्थापित पक्षांसमोर एक कडवे आव्हान कुडाळ गटात निर्माण झाले आहे.

कुडाळ गटात जयश्री शेवते यांनी  वाहनांचा ताफा व अलोट गर्दीसह तुफान शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल
केल्याने, भाजपा राष्ट्र्वादी शिवसेना आदी प्रस्थापित पक्षांना शेवते यांच्या उमेदवारीला गांभीयनि घ्यावे लागणार
आहे.शेवते यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी पक्षाचे टेन्शन वाढले आहे.शेवते कुटुंब ना. शिवेंद्रसिंहराजे समर्थक असल्याने मंत्री महोदय या अपक्ष अर्जाबाबत काय
निर्णय घेतात. याचीच चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे.कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्त संजय शेवते यांच्या सुविद्य पत्नी व संपूर्ण तालुक्यात युवकांचा आयडॉल
असलेल्या दीपक शेवते यांच्या मातोश्री कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शेवते यांनी तुफान शक्तिप्रदर्शन केल्याने त्यांच्या शक्तीप्रदर्शनाची तालुक्यात चर्चा आहे. असंख्य वाहनांचा ताफा,बाउन्सर व गटातीलच ज्येष्ठ नागरिकांपासून युवक व महिला यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज दिमाखात सादर केला.त्यामुळे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांची धास्ती वाढली आहे.

शेवते यांच्या उमेदवारीचा फटका बसणार नेमका कोणाला बसणार हे आगामी काळात समोर येणार आहे.
जयश्री शेवते यांचे सुपुत्र दीपक यांचा संपूर्ण तालुक्यात विशेषता कुडाळ गटातील गावागावात युवकांचा संग्रह मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यातील युवकांचा आयडॉल म्हणून दीपक शेवते यांच्याकडे पाहिले जाते अर्ज दाखल करताना युवकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली है तिघेही
जनतेसाठी करत असलेले कार्य हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरू शकते जयश्री शेवते या कुडाळ ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवारात सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आल्या होत्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी उठावदार कार्य केले असून संजय शेवते व दीपक शेवते है ना
शिवेंद्रसिंहराजे यांचे कटर समर्थक समजले जातात

 संजय शेवतेंचे वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम

जयश्री शेवते यांचे पती संजय शेवते हे गेले वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी आतापर्यंत अनेक निराधार महिलांना पेन्शन योजना त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.कुडाळच्या  सर्वांगीण विकासात व सामाजिक कार्यात देखील संजय शेवते हे कार्यरत राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क गटातील गावागावांमध्ये दांडगा असल्याने जयश्री शेवतेंची उमेदवारी ही दमदार ठरू शकते. त्याचबरोबर गटातील माळी समाज जयश्री शेवतेंच्या  पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याने त्यांच्या उमेदवारीला एक मोठे बळ निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button