निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या विकास देशपांडेंच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ
मेढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी धनंजय पवार ;सचिन करंजेकर यांची नियुक्ती

मेढा : वास्तावनामा वृत्तसेवा
मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग सतरा मध्ये इच्छुक असलेल्या विकास देशपांडे यांना पक्ष नेतृत्वाने प्रभाग सात मधून उमेदवारी दिली होती. आपला प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागामध्ये देशपांडे यांनी शिवसेनेचे उमेदवारसह अन्य दोन उमेदवारांना कडवी टक्कर देत या ठिकाणी विजय संपादित केला होता.त्यांच्या या विजयाचा विचार करून आज उपनगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली.
खरंतर उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग १७ मधून निवडून आलेले नगरसेवक शिवाजीराव देशमुख हे देखील इच्छुक होते.यावर गुरुवारी अनेक राजकीय खलबते झाली. मात्र अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशाने प्रभाग सातचे विजयी उमेदवार विकास देशपांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज शुक्रवारी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली.तर स्वीकृत नगरसेवक पदी धनंजय पवार व अन्य एका जागेवर शहराच्या विकासात्मक वाटचालीच्या दृष्टीने शिवसेनेचा विचार करून शिव सेनेस संधी देत या पदी सेनेच्या सचिन करंजेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजप नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, नूतन नगराध्यक्ष रुपाली वारागडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, शिवाजी गोरे, करिकि तिवाटणे, बापू जवळ, यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासास आपण पुढील काळात पात्र राहून काम करू. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन मेढा शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून माझा कामावर भर राहील. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, नेते वसंतराव मानकुमरे यांनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करणार.
विकास देशपांडे उपनगराध्यक्ष मेढा



