राजकीय

जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी कुडाळकर एकवटले

कुडाळ जिल्हा परिषद गटातील ओबीसी बांधवांची वज्रमूठ

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा

  आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळीकडेच राजकीय वातावरण
ढवळून निघाले असताना कुडाळ तालुका जावली येथे कुडाळ जिल्हा परिषद गटातील ओबीसी समाज बांधवांची
महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली, यावेळी कुडाळ विभाग, आनेवाडी विभाग व मेढा विभाग या तिन्ही
विभागातील प्रमुख ओबीसी बांधव उपस्थित होते.

यावेळी महिला अध्यक्षा गीताताई लोखंडे, प्रतापगड कारखान्याचे संचालक दादा पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश बारटक्के, नामदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक समीर आतार, बाजार समितीचे संचालक मनीष फरांदे, प्रतापगड कारखान्याचे संचालक विजय शिवते, कुडाळ ग्रामपंचायतचे सदस्य राहुल ननावरे, आशिष रासकर, दिनेश किरवे, कुडाळ यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील रासकर,
धनंजय पोरे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय कुंभार, दिनकर पवार, अनिल किरवे, भगवान राक्षे, सर्जापूर
येथील ज्येष्ठ नेते दासानाना बोराटे यांच्यासह ओबीसी समाजातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

यावेळी बोलताना दादा पाटील म्हणाले, कुडाळ जि.प गटात आोबीसी महिला आरक्षण जाहिर झाले आहे,
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी ही मूळ ओबीसी धारक
असलेल्या ओबीसी बांधवालाच मिळावी, आतापर्यंत प्रत्येक वेळेस काही जणांनी ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण
करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे,

सातत्याने ओबीसी आरक्षणावर घाला घालत एन टी
प्रवर्गातील उमेदवाराने उमेदवारी मिळवली आहे, मात्र यापुढे आम्ही मूळ ओबीसी बांधव हे चालू देणार नाही असेही
ते म्हणाले,

 

यावेळी महेश बारटक्के बोलताना म्हणाले, आजची बैठक ही मूळ ओबीसी बांधवांना न्याय मिळवून
देण्यासाठी आयोजित केली आहे, तब्बल वीस वर्षानंतर कुडाळ जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण पडले आहे,
त्यामुळे यावेळी कुडाळ जिल्हा परिषदेची उमेदवारी ही मूळ ओबीसी बांधवांनाच मिळाली पाहिजेत, नामदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले हे तालुक्यातील सर्व जाती जमातीतील व सर्व समाजातील घटकांना समान न्याय देत
असतात हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणूनच यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कुडाळ
गटातील मूळ ओबीसी बांधवांना नक्की न्याय मिळवून देतील अशी मला खात्री असून नामदार शिवेंद्रसिंहराजे
भोसले हे आमच्यासाठी दैवत असून ते जो आदेश देतील तो आदेश प्रमाण मानून कुडाळ गटाला राजकीय
गतवैभव प्राप्त करून देऊ.

 

आशिष रासकर बोलताना म्हणाले, कुडाळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी कुडाळ मधील कोणत्याही उमेदवाराला
दिली तरी त्याचे एक मुखाने काम करू, कुडाळ हे जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठे लेकसंख्येचे गाव असून
वीस वर्षानंतर कुडाळ गटाला आोबीसीची संधी मिळाली आहे त्यामूळे मुळ आोबीसी घटकालाच संधी नामदार
बाबाराजे देतील अशी खात्री व्यक्त केली.

धनंजय पोरे यांनी ओबीसी समाजामध्ये समाजातील विविध घटक व बारा बलुतेदार येत असल्याने दरवेळी एकाच घटकाला उमेदवारी कशासाठी द्यायची याबाबत आवाज उठवला.राहूल ननावरे बोलताना म्हणाले, कुडाळ गट आजपर्यंत सलग तीन टर्म बाबाराजे यांना मिळवून देऊ शकलो नाही याची आोबीसी म्हणून खंत वाटत असून यावेळी कुडाळकर ही झालेली चुक नक्की सुधारतील व बाबाराजे देतील त्या कुडाळ मधील उमेदवाराचे काम एकमुखाने करू असेही सांगितले, यावेळी सर्व ओबीसी बांधवांनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या व सर्वांनी एक मुखाने आपल्या सर्वांचे नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे कुडाळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी ही ओबीसी समाजातील मूळ ओबीसी घटकालाच द्यावी अशी मागणी करणार असल्याचे ठरविण्यात आले. दासानाना बोराटे यांनी यावेळी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button