राजकीय

मेढा नगरपंचायत निवडणूक शिव-सेना सर्व ताकदीनिशी लढणार

संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम ; मेढ्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पडल्या पार

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा

 मेढा नगरवासीयांचा वाढीवकरपट्टीचा विषय दोनच दिवसात शिवसेनेने मार्गी लावल्यामुळे शिवसेना एक भक्कम पर्याय येथील नागरिकांना वाटू लागली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मिळत असलेली भक्कम साथ यामुळे संपूर्ण ताकदीनिशी आता मेढा नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना(एकनाथ शिंदे) लढणार असल्याचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी सुतवाच केले.

आज बुधवारी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात मेढा नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती.यावेळी बोलताना अंकुश कदम म्हणाले मेढा शहरातील वातावरण वारे आता फिरू लागले आहे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शहरातील नागरिक आता पेटून उठला आहे. त्यामुळेच आज आमच्याकडे सतरा प्रभागांमधून अनेक मातब्बर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी मागणीसाठी अर्ज केले, व मुलाखती देखील दिल्या. यामध्ये विशेषता महिला वर्गाचा सहभाग अधिक होता.

सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले शिवसेना सक्षमपणे ही निवडणूक लढणार असून, इच्छुकांच्या गर्दी मुळे आम्ही नगरपंचायत नक्की ताब्यात घेऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे. दरम्यान मेढा नगरपंचायत निवडणूकसाठी १७ प्रभागातून थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी जवळपास २९ जणांनी आज मुलाखती दिल्या.

यावेळी नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम, सह संपर्कप्रमुख एकना ओंबळे,शहर प्रमुख संजय सुर्वे, सचिन करंजेकर, उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, तालुकाप्रमुख समीर गोळे, शांताराम कदम, सुधीर करंदकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button