धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणग्रस्तांचे प्रश्न मीच सोडवणार : मानकुमरे
मानकुमरे यांचा कुडाळ येथील पाणी परिषदेतुन इशारा

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
आपणास धरणाच्या भिंतीवर येऊ देणार नाही.असे काही जण धमकी देत आहेत, परंतु धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मीच सोडवणार. ज्यांच्यात धमक असेल त्यांनी मला अडवून दाखवावे. असा थेट इशारा वसंतराव मानकुमरे यांनी विरोध करणारांना कुडाळ येथील पणीपरिषदेतून दिला.
कुडाळ ता. जावली येथे महू-हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीच्या वतीने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी मानकुमरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे, भाजप मंडलाध्यक्ष संदीप परामणे,मोहन मानकुमरे,ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, माजी उपसभापती रवींद्र परामणे, नितीन गावडे,मालोजी आण्णा शिंदे,हिंदुराव तरडे,रिपाई तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, मच्छिंद्र मुळीक, इंद्रजीत भिलारे, तानाजी शिर्के, विकास धोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी मानकुमरे म्हणाले सदरचे आंदोलन हे नामदार बाबाराजे यांना पूर्ण माहिती देऊनच आयोजित केलेले होते. यापूर्वीही शिंदे साहेब आमदार असताना अपण अनेक आंदोलने केली आहेत. बाबाराजेंना दोनवेळा प्रचंड बहुमताने निवडून दिले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवणे हा आपला हक्क असल्याचे मानकुमरे यांनी यावेळी ठणकावून सांगत ना. बाबाराजेंना आपले अश्रू दिसावेत म्हणून हे आंदोलन उभे केले होते.
मुंबईतील मराठा समाजाचे आंदोलन तसेच मंत्री मंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे आजच्या पाणी परिषदेला येऊ शकलो नाही.विरोधक बोलत राहतील अडचणी आणतील परंतु लक्ष देऊ नये.येत्या महिन्यात महू-हातगेघर धरणाच्या भिंतीवर जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे ठोस आश्वासन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भ्रमणध्वनी वरून दिल्यानंतर महू व हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीच्या वतीने सुरु असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी जाहीर केले.

यावेळी प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले मानकुमरे भाऊ हे तालुक्याचे चाणक्य आहेत.धरणग्रस्तांचे ९५% टक्के विषय मार्गी लागले आहेत.त्यामुळे राहिलेले पाच टक्के प्रश्न आता जर हा लढा उभा करायचा असेल आणि जनसमुदाय गोळा करायचा असेल तर लाभार्थी लोकांना सोबत घेतले पाहिजे. हे त्यांनी ओळखून हा लढा पुकारला आहे.यामध्ये त्यांचा हेतू चांगला आहे. त्यामुळे वसंतराव मानकुमरे यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठाम उभे राहू. येणाऱ्या काळामध्ये महाराज साहेबांच्या प्रयत्नातून निश्चितपणे आपल्या शिवारामध्ये पाणी लवकरात लवकर येईल. हा लढा आणि ही कृती समिती कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या गटाची नाही,कुठल्या नेत्याची नाही.आपण सगळेजण पक्ष सगळे बाजूला ठेवून यात सामील झालेलो आहोत.असेही सौरभ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा
आपला नेता सत्तेवर असताना आणि स्वतः कडे सेनेचे मोठे पद असताना, ज्याला तालुक्यात इंच भर सुद्धा काम करता आले नाही. त्याला सर्वसामान्य जनतेच्या वेळ प्रसंगात उभे राहणाऱ्या तसेच तालुक्याच्या विकासात सहभाग असणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांच्या वर आरोप करण्याचा अधिकार नाही. अशी टीका माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी संदीप पवार यांचेवर केली.
यावेळी इंद्रजीत भिलारे यांनी महू हातगेघर धरणांची बंदिस्त पाईपलाईन ही मोरघर गावठाणाच्या वरून घेतल्यास मोरघर सह जावळेवाडी, मोरेवाडी, एरुणकरवाडी या गावांचा देखील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा. हे धरण सायगाव विभागातील शेतकऱ्यांना नव संजीवनी देणारे ठरणार आहे असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महेश बारटक्के यांनी स्वागत प्रास्ताविक केले.विकास धोंडे यांनी आभार मानले.



