रिपाई पश्चिम महाराष्ट्र शिक्षक मतदार संघाच्या अध्यक्षपदी प्रा माणिक आढाव यांची निवड

सातारा: वास्तवनामा वृत्तसेवा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने तसेच दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक मतदार संघ पश्चिम महाराष्ट्र संघटक समन्वयक अध्यक्षपदी प्राध्यापक माणिक आढाव यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते प्रा.आढाव यांना देण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघांमध्ये मोठ्या ताकदीने बहुजन विचारांचे सर्व शिक्षक जोडून शिक्षकांच्या समस्यांना व शिक्षकांना न्याय देण्याचे काम रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती दादासाहेब ओव्हाळ यांनी यावेळी दिली. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रा.आढाव यांनी निवडीदरम्यान सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास तानाजी मिसळे, बाळासाहेब पवार, कैलास भाऊ जोगदंड, अशोक भाऊ ससाणे, अंकुश भिंगारदिवे, अंकुश भालेराव, पुणे ,सांगली ,सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष संग्रामदादा रोकडे,किरण ओव्हाळ, सुनील ओव्हाळ,सागर ओव्हाळ,मदन खंकाळ,किरण ओव्हाळ,राजू ओव्हाळ, आदी उपस्थित होते.
या निवडीबाबद्दल प्रा.आढाव यांचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आदींनी अभिनंदन केले.



