प्रशासकीय

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून लोकनियुक्त सरपंचांसह महिला-ग्रामस्थांच्या कामकाजाचे कौतुक

नाचणीचे गाव कुसुंबी गावास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची सदिच्छा भेट

कुसुंबी : वास्तवनामा वृत्तसेवा

   नाचणीचे गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणाऱ्या कुसुंबी गावातील लोकनियुक्त सरपंचांसह ग्रामस्थांनी गावात विविध योजना राबवत गावात अमुलाग्र बदल केला आहे. या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कुसुंबी गावचे लोकनियुक्त सरपंच व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.आज शनिवारी याशनी नागराजन यांनी नाचणीचे गाव श्री क्षेत्र कुसुंबी गावास सदिच्छा भेट दिली.

यावेळी नागराजन यांनी कुसुंबीतील ऍग्रो मिलेट्स फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली.या कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रोडक्टची माहिती संचालक मंडळाच्या माध्यमातून आढावा घेऊन संवाद साधून त्यांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिलांनी अतिशय उत्तम प्रकारे, स्वच्छ व दर्जेदार पद्धतीने नाचणीवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने पाहून त्यांना आनंद झाला.या कंपनीची स्थापना अगदी औद्योगिक स्वच्छता मानकांना प्रमाणे योग्य पद्धतीने करण्यात आलेली आहे.दहा पेक्षा जास्त नाचणी वर प्रक्रिया केलेले पदार्थ आधुनिक व अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी तयार केले जात आहेत.यामुळे या कंपनीचा भविष्य काळ उज्वल दिसत आहे.त्याचबरोबर गावातील संगिता ताई व त्यांच्या सहकारी महिलांचा विशेष उल्लेख करीत त्यांनी गावातील सर्व महिलांना एकत्रित करून योग्य नेतृत्व सिद्ध केले आहे.या सोबतच महिलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेबद्दल नागराजन यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी गटविकास अधिकारी निलेश पाटील सरपंच मारुती चिकणी उपसरपंच मोरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेला देखील भेट दिली व तेथील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button