“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत खर्शी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सायगाव:वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ येथे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामस्थ यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा, राष्ट्रीय भक्ती गीते असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

खर्शी तर्फ कुडाळ ग्रामपंचायत नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर राहते. “हर घर तिरंगा” अभियान ग्रामपंचायतीच्या वतीने यशस्वीरित्या राबवण्यात आले. या अनुषंगाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेचे आज गुरुवारी जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व शिक्षक नेते मच्छिंद्र मुळीक व त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी मुळीक यांच्या हस्ते या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण पार पडले.
यावेळी अत्यंत सुबक व देशभक्तीपर रांगोळी विद्यार्थ्यांनी रेखाटल्या होत्या. कार्यक्रमास सरपंच दुर्गाताई भिसे, ग्रामसेवक जाधव ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या चिंचकर ,शिक्षिका देशमुख, सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



