राजकीय

जावळीच्या भूमिपुत्राच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन

सोमवारी ४ ऑगस्ट रोजी पाचवड ते मेढा रॅलीचे आयोजन

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

    जावळी तालुक्यातील कोलेवाडी (हुमगाव)गावचे सुपुत्र उद्योजक दत्ताशेठ भालेघरे यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा व पाचवड, कुडाळ, करहर , दरे ते मेढा अशा भव्य रॅलीचे तद्नंतर मेढा येथील एसटी डेपो समोर वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भव्य जाहीर सभेचे आयोजन सोमवार ४ऑगस्ट दुपारी २ वाजता करण्यात आले आहे.तरी बहूसंख्येने या रॅलीस उपस्थित राहण्याचे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले आहे.

अत्यंत गरीब कुटुंबातुन दत्ता भालेघरे (पवार)हे मुंबई मध्ये जाऊन मेहनत करून आपल्या हिमतीने उद्योजक झाले.त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक लोकांना रोजगार मिळाला असून,भालेघरे यांनी आपल्या कर्तृत्वावर नाव कमवले त्यांची झालेली प्रगती तालुक्यातीलच काहींना खपत नाहीये.त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींनी थेट विधानपरिषदेत प्रश्न मांडला व भालेघरे यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

माझ्या पेक्षा इतर कोणी जावळी तालुक्यातून मोठा होऊ नये, जे हवे ते मला व माझ्या कुटुंबालाच हवे अशी स्वार्थीवृत्ती बाळगणारे स्वतःला प्रचंड मोठा कामगार नेता समजणारे एकीकडे कामगांरासमोर गळा काढून मी कसा कामगारांचा तारणहार आहे. अशा भुलथापा देऊन कामगार क्षेत्राची पिळवणूक करायची,कंपन्यांमध्ये संप घडवून आणायचे, आणि मॅनेजमेंट ला हाताशी धरून सेटलमेंट करायची.

अशा कामगार नेत्यांनी पावसाळी अधिवेशनात भर सभागृहात आपल्याच तालुक्यातील सुपुत्र असलेले दत्ता भालेघरे (पवार)यांचेवर प्रश्न उपस्थित करून एसआयटी चौकशीची मागणी केली.हे कितपत योग्य आहे.

त्यामुळे अशा कर्तृत्वान उद्योजकाच्या समर्थनार्थ सोमवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा.संपूर्ण तालुक्यातून भव्य रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील युवकांनी,शेतकरी,नागरिकांनी दत्ता भालेघरे यांच्या समर्थनार्थ या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन मानकुमरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button