राजकीय

जावळीच्या विकासासाठी एकनाथला हवे ते सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

   सामान्य कुटुंबातील स्वाभिमानी शिवसैनिक एकनाथ ओंबळे यांनी कुसुंबी गटात आपल्या पत्नीच्या माध्यमातून जो विजय संपादित केला तो कौतुकास्पद आहे. जावळीच्या विकासासाठी एकनाथला हवे ते सहकार्य करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कुसूंबी गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कुसूंबी गटातील विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

भेटीदरम्यान कुसूंबी गटातील रस्ते, पाणीपुरवठा,पर्यटन वाढ, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांसंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भगवा उंचावतो” असे म्हणत नवी मुबंई संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम,एकनाथ ओंबळे यांच्यासह शिव सेनेच्या तालुक्यातील नेतृत्वाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच “भगव्याची उंची तुम्ही वाढवली” या शब्दांत त्यांनी जनतेच्या जनादेशाचा सन्मान केल्याचे सांगण्यात आले.

या शिष्टमंडळात सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओबळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख नंदू गोरे, सचिन शेलार, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, तालुकाप्रमुख समीर गोळे तसेच सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदीप कासुर्डे आणि बाळासाहेब शिर्के उपस्थित होते.

माझ्या विजयाचे सर्व श्रेय गटातील कार्यकर्ते,जनता व जनतेच्या विश्वासाला मी देते. कुसूंबी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिल्हापरिषदेच्या माध्यमातून मूलभूत व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध राहणार  आहे. गटाच्या विकासासाठी राज्यस्तरावरून आवश्यक निधी व प्रशासकीय सहकार्य मिळावे,

सौ.कविता ओंबळे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर कुसूंबी गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button