राजकीय

कुडाळ गावातील इंदिरानगर-लक्ष्मी रोड रस्त्याचे काम आमच्यामुळेच मार्गी

जिल्हा दिशा समिती सदस्य माजी सरपंच विरेंद्र शिंदेंचा पाठपुरावा

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
       तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कुडाळ गावातील मुख्य रस्ता असलेल्या इंदिरानगर लक्ष्मी रोड बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजीराजे चौक या रस्त्याचे काम कामाबाबत सातारा जिल्हा दिशा समिती सदस्य व माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर हे काम बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निधीतून या कामाला मंजुरी मिळाल्याने हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वीरेंद्र शिंदे यांनी दिली

पाचवड-कुडाळ राज्यमार्गावरील कुडाळ गावांतर्गत येणारा इंदिरानगर ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक हा रस्ता मंजूर करण्यात आला होता.परंतु त्या कामास काही तांत्रिक अडचणी आल्याने विलंब लागला होता. या रस्त्यावर महाराज शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज असल्यामुळे शाळेत जाता येता विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये मोठी गैरसोय होत होती. मुलांच्या अंगावर चिखल व पाणी उडत होते.

आता या ठिकाणी दोन्ही बाजूस आरसीसी गटर व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फूटपाथ याची सोय होणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या रस्त्याला असल्यामुळे या रस्त्याला खूप वर्दळ राहते. या रस्त्याच्या बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना असल्यामुळे हा रस्ता गावातील व भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. ही बाब ध्यानात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या रस्त्याच्या काम व्हावे अशी मागणी होती.

त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला.नुकताच या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याने या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटर बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे,यामध्ये फुटपाथ देखील बांधण्यात येणार आहे.अशी माहिती शिंदे यांनी दिली.

यावेळी कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, युवा नेते आशिष रासकर, बांधकाम व्यवसायिक समीर भाई आत्तार,पिंपळवण अध्यक्ष महेश पवार, समीर डांगे, यशवंत कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अटकेकर साहेब ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button