स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे जिल्हाप्रमुख रणजित भोसले
सोमर्डी येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

कुडाळ /वास्तवनामा वृत्तसेवा
काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत, समिती,नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज होऊन तयारीला लागावे असे आवाहन शिवसेना (शिंदे गट )जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांनी केले.
जावली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सोमर्डी येथे रणजित भोसले ,सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भोसले बोलत होते.
यावेळी भोसले म्हणाले स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन पक्षाची बांधणी करून आगामी निवडणुकांसाठी सक्षम उमेदवार देण्याचा दृष्टीने कामाला लागावे.
यावेळी सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, यावर वरिष्ठांशी चर्चा करून त्यावर लवकरात लवकर योग्य मार्ग काढू असेही ओंबळे यांनी यावेळी आश्वासन दिले. तसेच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना जिल्हाप्रमुख व शिवसैनिक यांचेसमोर कानपिचक्याही दिल्या.
यावेळी विधानसभाप्रमुख प्रशांत तरडे म्हणाले महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरेल मात्र आपण निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिकांनी तयारी करावी.राज्याचे उपमुख्यमंत्री, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे आदेश देतील त्याप्रमाणे आगामी निवडणुका लढण्यासाठी तयारीत रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी वाई विधानसभाप्रमुख विकास शिंदे,संभाजी पाटील,तालुकाप्रमुख समीर गोळे वं शांताराम कदम, संजय सुर्वे,अमरदीप तरडे, कुलदीप नलवडे,गणेश कवी,गणेश निकम, विष्णू बेलोशे,सचिन शेलार,प्रशांत जुनघरे,सुधीर करंदकर, सरपंच सीताराम पवार, सरपंच श्रीरंग गलगले,उपसरपंच उमेश पवार व सूर्यकांत सणस,प्रसाद धनावडे,अक्षय रांजणे,माऊली शिर्के,युवराज तरडे,सुरेशनाना मोरे,आदेश गावडे, बाबू पवार, विजय कांबळे, दिपक शिंदे,लालसिंग शिंदे, प्रकाश गोळे,सुजीत बेलोशे,दत्तात्रय दरेकर यांचेसह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते,



