राजकीय

प्रतापगड-अजिंक्य उद्योगसमूहास सर्वतोपरी सहकार्य करणार :मुख्यमंत्री फडणवीस

मुबंई / वास्तवनामा वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन प्रतापगड साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड-अजिंक्य या सहकारातील उद्योगसमूहाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योगच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा देखील झाली.या चर्चेस  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सकारात्मक निर्णय घेत, अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग ह्या सहकारातील भागीदारी ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संचालक दादा पाटील यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button